Pages

Follow by Email

Tuesday, 24 May 2016

सुपर कम्प्युटर्स : मेड इन इंडिया

नॅशनल सुपर कंम्प्युटिंग मिशनच्या अंतर्गत देशाची संशोधन क्षमतेत अमर्याद वाढ करण्यासाठी सुपर कम्प्युटर्सची निर्मिती केली जात आहे. या मिशन अंतर्गत ७० सुपर कम्प्युटर्स बनवण्यात येत असून ऑगस्ट २०१७ मध्ये ती कार्यान्वित करण्यात येणार आहेत.   

 गेल्या मार्च महिन्यात या मिशनची सुरुवात करण्यात आली होती, त्यासाठी ४,५०० कोटी रुपयांचा निधी ही केंद्राने दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलाजी या मिशनची अंमलबजावणी करत आहे.    २०१५ मध्ये जगातील ५०० सुपर कम्प्युटरच्या यादीत भारतातील ११ संगणकांचा समावेश होता. ‘परम’ हा भारताचा पहिला सुपर कम्प्युटर ठरला होता.    सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाचे सचिव अशुतोष शर्मा म्हणाले, ‘सुपर कम्प्युटरमध्ये सर्वात मोठे आव्हान हे उर्जेचे आहे. अशा प्रकारच्या संगणाकांना फार मोठ्या प्रमाणावर वीज लागते. तसेच यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही जास्त असते. या संगणकांचा वापर वाढवायचा झाल्यास विजेची मोठी उपलब्धता हे आव्हान ठरणार आहे. असे संगणक हातळण्यासाठी कुशल मनुष्यबळ ही लागणार आहे.’   नॅशनल नॉलेज नेटवर्कमध्ये ही या संगणकांचा वापर केला जाणार आहे.    शर्मा म्हणाले, ‘यावर्षी सुपर कम्प्युटरची निर्मिती, हार्डवेअरची निर्मिती यावरच लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सुपर कम्प्युटर निर्माण करणाऱ्या काही परदेशी कंपन्यांनी भारतात येवून उत्पादन करावे आणि प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.’

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email