Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

मरे, सेरेना जिंकले

आपला 29 वा वाढदिवस दणक्यात साजरा करताना ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेने नोव्हाक जाकोव्हिचचा पराभव करून इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. गेल्या रविवारी झालेल्या माद्रिद ओपनमधील फायनलचा बदला घेताना मरेने नोव्हाकचा 6-3 आणि 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. वर्षातील दुसरी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपनला एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना मरेचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. महिला गटात सेरेना
विल्यम्सने अजिंक्यपद पटकावले.    क्ले कोर्टवरील मरेचे हे पहिलेच अजिंक्यपद ठरले. नोव्हाकने क्ले कोर्टवरील गेल्या चारही लढती जिंकल्या होत्या; पण यावेळी तो मरेला मात देऊ शकला नाही. सेरेनाने 9 महिन्यानंतर एखादी स्पर्धा जिंकताना अमेरिकेच्याच मॅडिसन किस्वर 7-6 आणि 6-3 असा विजय साजरा केला. सेरेनाने शेवटचे अजिंक्यपद ऑगस्ट महिन्यात सिनसिनाटी येथे जिंकले होते. त्यानंतर अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये ती हरली होती. क्ले कोर्टवर 2002  पहिल्यांदाच दोन अमेरिकन महिला खेळाडूंदरम्यान अंतिम लढत रंगली.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email