Pages

Follow by Email

Monday, 30 May 2016

ज्येष्ठ अभिनेते सुरेश चटवाल यांचे निधन

सिने आणि टीव्ही अभिनेते सुरेश चटवाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. एफआयआर या मालिकेत काम करणा-या सुरेश यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. सुरेश यांचे चिरंजीव यमन चटवाल यांनी याबाबत माहिती दिली. एफआयआर मालिकेतील सुरेश यांची सहकलाकार कविता कौशिक हिनेदेखील याबाबत ट्विटरद्वारे दुःख व्यक्त केले. कविताने म्हटले की,
एफआयआरमधील आमचे लाडके कमिशनर श्री. सुरेश चटवाल हे आता आपल्यात राहिले नाहीत. ते नेहमीच उत्साही असायचे. ब-याचशा जुन्या फिल्मी गोष्टी ते आम्हाला सांगायचे. त्यांचा आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिल. सुरेश यांनी १९६९ साली ‘राखी राखी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी करण अर्जुन, कोयला, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले. २०१० साली प्रदर्शित झालेल्या नक्षत्र या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर शेवटची भूमिका साकारली

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email