Pages

Follow by Email

Monday, 23 May 2016

अब्जावधींच्या गुणतवणूकीचा छाबहार करार

 इराणशी असणाऱ्या व्यापारी संबंधात वृध्दी करणारा तसेच अफगाणिस्तान आणि मध्य अशियायी व्यापारावर प्रभाव टाकणारा मध्यवपूर्ण करार आज भारत आणि इराण दरम्यान झाला. इराणमधील छाबहार मुक्त व्यापार बंधरामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक भारताकडून केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौका वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांनी दिली.   पंतप्रधान नरेंद्र मोदी इराण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात छाबहार संदर्भात हा महत्वपूर्ण करार होत आहे. याबाबत माहिती देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, कांडला आणि छाबहार बंदरातील अंतर मुंबई आणि दिल्ली अंतरापेक्षाही कमी आहे. या करारामुळे भारताचा इराणमध्ये व्यापारी माल उतरवून त्यानंतर अफगाणिस्तान, मध्य आशिया, रशियाच्या प्रदेशात नेता येणार आहे. यासाठी रेल्वे  आणि रस्ते वाहतूकीचा वापर केला जाईल. यामुळेच या छाबहार मुक्त व्यापार बंदरावर एक लाख कोटी रूपयांपर्यंत गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. व्यापरीदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या छाबहार बंदराची बांधणी आणि देखाभाल करण्यासंदर्भात या करारामुळे भारतास इराणसह अफगाणिस्तान आणि मध्य आशियामधील राजनैतिक प्रभाव वाढविण्याची संधी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email