Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

सुधा सिंगने मोडला ललिताचा राष्ट्रीय विक्रम


शांघाय : वृत्तसंस्था 
प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंगने 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.  अंतिम फेरीत ती आठव्या स्थानावर राहिली. ‘सातारकन्या’ ललिता बाबरला मात्र 14 धावपटूंमध्ये 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. सुधाने 9 मिनिटे आणि 26.55 सेकंदात अंतर पार करून आपलीच सहकारी ललिताचा विक्रम मोडला. यापूर्वी ललिताने फेडरेशन कप स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक पटकावले होते. त्या स्पर्धेत सुधा दुसर्‍या स्थानी राहिली होती.  सुधा आणि ललिता यापूर्वीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. 
 
गेल्या महिन्यात दिल्‍लीत झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत ललिताने  9 मिनिटे 27.09 सेकंदात अंतर पार करून नवा राष्ट्रीय विक्रम रचला होता. हा विक्रम आज सुधाने मोडला. आशियाई चॅम्पियन असलेल्या ललिताची कामगिरी मात्र डायमंड लीगमध्ये निराशाजनक ठरली. 9 मिनिटे 43.40 सेकंदात तिने अंतर पार केले. 2015 ची वर्ल्ड चॅम्पियन  केनियाच्या हायविन जेप्कीमोईने 9 मिनिटे 07.42 सेकंदात अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले. बहारीनची केनियन धावपटू रुथा जेबेट दुसर्‍या स्थानावर राहिली. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email