Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

मंत्रीमंडळ निर्णय; जास्तीत जास्त तरुणांना मुद्रा बँक योजनेचा लाभ देणार

मुंबई : मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 
यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक
सहाय्य तसेच देशांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात मुद्रा बँक योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेनुसार शिशु, किशोर व तरुण या तीन गटांतर्गत उद्योग उभारणीसाठी कुठल्याही प्रकारच्या तारणाशिवाय 10 हजार ते 10 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email