Pages

Follow by Email

Saturday, 21 May 2016

विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री

माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व धर्मदमचे आमदार पिनरयी विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री असतील. माकपच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये विजयन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ९३ वर्षीय व्ही. एस. अच्युतानंदन यांना पक्ष सचिवालयात बोलावून निर्णयाची कल्पना देण्यात आली. या निर्णयाबाबत अच्युतानंदन नाराज आहेत. त्यामुळे लगेचच निवासस्थानी ते निघून गेले. अच्युतानंदन यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांची तुलना फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी केली.
ते आमचे मार्गदर्शक आहेत अशा शब्दांत येचुरींनी अच्युतानंदन यांचे कौतुक केले. दरम्यान, विजयन यांच्या शपथविधीची तारीख नंतर निश्चित केली जाणार असल्याचे डाव्या आघाडीच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत माकपचे राज्य सचिव कोडियारी बालकृष्णन घटक पक्षांशी चर्चा करणार आहेत. कन्नूर जिल्ह्य़ातील धर्मदम मतदारसंघातून ३६ हजार ९०५ मतांनी ते विजयी झाले आहेत. माकपचे ते चौथे मुख्यमंत्री असतील. ७२ वर्षीय विजय कुशल संघटक मानले जातात. गरीब कुटुंबातून आलेले विजयन राजकीयदृष्टय़ा प्रभावी थिय्या समाजातून आले आहेत. केरळमधील पक्षसंघटनेवर त्यांचा प्रभाव आहे. १९९६ ते ९८ या काळात ऊर्जामंत्रिपद सांभाळताना त्यांनी ठसा उमटवला होता. अच्युतानंदन यांचे वय व हालचालीच्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी विजयन यांचे नाव निश्चित केले आहे. -सीताराम येचुरी, माकप, सरचिटणीस भाजपच्या जखमी कार्यकर्त्यांचे निधन त्रिसूर : इडियाविलंगु येथे गुरुवारी विजयी मिरवणुकीदरम्यान माकप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली होती. यात माकप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रमोद या भाजप कार्यकर्त्यांचे निधन झाले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी बंदचे आवाहन केले आहे. निकालानंतर केरळमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. गुरुवारी कन्नूर जिल्ह्य़ात पिरनयी येथे माकप कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. - 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email