Pages

Follow by Email

Saturday, 21 May 2016

भारतीय, पाकिस्तानी शास्त्रज्ञांचा गौरव अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते


वॉशिंग्टन - विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनात योगदान देणाऱ्या अमेरिकी-भारतीय आणि अमेरिकी पाकिस्तानी शास्त्रज्ञांचा आज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

व्हाइट हाउस येथे झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष बराक ओबामा यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याचे आणि संशोधनाचे कौतुक केले. हॉवर्ड मेडिकल स्कूल आणि मॅंचेच्युसेट्‌स जनरल हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे राकेश के जैन यांना कर्करोग निदान, प्रतिबंध आणि उपचारातील संशोधनाबाबत नॅशनल मेडिकल ऑफ सायन्स या पुरस्काराने गौरविले. ते आयआयटी-कानपूरचे माजी विद्यार्थी होते. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान डॉ. महंमद अली जिना यांची वैयक्तिक देखभाल करणाऱ्या डॉक्‍टरांचे नातू हुमायू (वय 53) यांनाही नॅशनल मेडल ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड इनोव्हेशन पुरस्काराने गौरविले. हुमायूंचे कुटुंबीय मूळचे जालंधरचे. फाळणीनंतर ते पाकिस्तानात आणि कालांतराने 1972 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले. हुमायू हे त्या वेळी नऊ वर्षांचे होते. त्यांचे आजोबा कर्नल इलाही बक्‍श हे मोहंमद अली जिनाचे वैयक्तिक डॉक्‍टर होते. या दोघांशिवाय अन्य पंधरा जणांना नॅशनल मेडल्स ऑफ सायन्स अँड नॅशनल मेडल्स ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड इनोव्हेशनने गौरविले. जैन यांनाही ट्यूमर बायोलॉजीतील संशोधनाबाबत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email