Pages

Follow by Email

Saturday, 28 May 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉफलाँगला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव मॉफलाँग भेट देऊन ‘खासी’ या आदिवासी समाजातील लोकांशी चर्चा केली. मोदी यांचा मेघालय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.    यावेळी त्यांनी आदिवासींचे पारंपरिक वाद्यांच्या वादनाचा आनंद घेतला. तसेच चहाचा आस्‍वादही घेतला. मोदी स्वच्छ भारत अभियानाशी जोडलेल्या काही नागरिकांचा गौरव करणार
आहेत.   नरेंद्र मोदी यांनी कालच शिलाँगमधील एलिफंटा फॉलचा दौरा करुन रामकृष्ण केंद्राच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन तरुणांना संबोधित केले. या कार्यक्रमात त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्‍यांचे जीवन या विषयावर भाषणही केले. तसेच पूर्वोत्तर परिषदेतर्फे शिलाँगमध्ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या ६५ व्‍या चर्चासत्राचे उद्घाटनही केले. यावेळी त्‍यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एका विशेष पॅकेजची घोषणा केली

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email