Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

सागरी पाण्यापासून वीजनिर्मितीचे नवे तंत्र


टोकियोः
सध्या विद्युतनिर्मितीसाठीच्या अनेक पर्यायी मार्गांचा शोध घेतला जात आहे. आता त्यामध्ये समुद्राच्या पाण्यापासून विद्युतनिर्मिती करण्यासाठीच्या नव्या मार्गाची भर पडली आहे. सागरी जलाचे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये रूपांतर करून नंतर त्याचा वापर वीजनिर्मितीच्या इंधनघटात करण्याचे तंत्रज्ञान शोधल्याचा
दावा वैज्ञानिकांनी केला आहे
प्रकाशाचा वापर करून सागरी जलाचे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये रूपांतर करता येते. प्रकाशउत्प्रेरक पद्धतीने हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ असून त्याची कार्यक्षमताही जास्त आहे, त्यामुळे हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर इंधन घटात करता येणार आहे. पृथ्वीवर सागरी जल सर्वात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सागरी पाण्याचा वापर करून हायड्रोजन पेरॉक्साईडचा इंधन घट तयार करता येतो, असे जपानच्या ओसाका विद्यापीठातील शुनीची फुकुझुमी यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी या प्रयोगात नवीन प्रकाशविद्युत रासायनिक घट (सेल) तयार केला असून तो हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती करणारा सौरघटच आहे. जेव्हा सूर्यप्रकाश प्रकाश उत्प्रेरकावर पडतो, तेव्हा तो फोटॉन म्हणजे प्रकाश कण शोषून घेतो नंतर त्या ऊर्जेचा वापर करून रासायनिक अभिक्रिया सुरू करतो, सागरी जलाचे ऑक्सिडीकरण ऑक्सिजनचे कमी होणे यामुळे हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती होते. 24 तास हा सेल किंवा घट प्रकाशात ठेवला असता हायड्रोन पेरॉक्साईडची सागरी जलातील संहती 48 मिलीमोलर होते. यापूर्वी शुद्ध पाण्यातही हायड्रोजन पेरॉक्साईडचे मूल्य 2 मिलीमोलर मिळवण्यात यश आले होते.


No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email