Pages

Follow by Email

Monday, 23 May 2016

यंदाची संकल्पना ‘आधुनिक काळातील परिमाणे’

मापनशास्त्रात झपाट्याने होणारे बदल टिपण्यासाठी यंदा ‘आधुनिक काळातील परिमाणे’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. २० मे १८७५ रोजी सुमारे १७ देशांनी मीटर कन्वेन्शनला मान्यता दिली, आणि आता ८० देश या मोहिमेत सहभागी झाले आहेत. यामुळे जगभरात सर्व परिमाणांमध्ये एकसंधता आली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २० मे हा दिवस जागतिक परिमाण (वजन-माप) दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पातळीवर मापन शास्त्रातील या घटनेमुळे मोठा सकारात्मक परिणाम झाला. व्यापार, उद्योगधंदे, खरेदी-विक्री, देवाण-घेवाण आदी सर्व बाबींकरिता वजने व मापे सर्वत्र एका विशिष्ट ठराविक मूल्याधारानेच वापरली जातात. 
मापन शास्त्रात अधिक विकास व्हावा, नवनवीन मापन तंत्रज्ञान विकसित करावे यासाठी राष्ट्रीय मापन संस्था (नॅशनल मेट्रॉलॉजी इन्स्टिट्यूट) प्रयत्नशील असते. ब्यूरो इंटरनॅशनल डेस पॉईडस् एट मेजर्सतर्फे (बीआयपीएम) आयोजित तुलनात्मक अभ्यासात देखील ही संस्था सहभागी होते. आधुनिक काळात परिमाणांसमोरील आव्हाने पेलण्यासाठी बीआयपीएम सर्व सदस्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. 
कन्टीन्युअस वेईंग मशिन्स, वाहनाचा वेग तपासण्यासाठीचे रडार्स अशाप्रकारच्या चलतक्रिया मोजण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागतात. तसेच नवीन तंत्रज्ञानामुळे अशाप्रकारच्या सतत बदलणार्‍या क्रिया मोजण्यासाठी नवीन पद्धती विकसित करण्यावरही भर दिला जात आहे. ऊर्जा व पाणी मोजण्यासाठी स्मार्ट मीटर्स हे असेच एक उदाहरण. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रॉलॉजीतर्फे देखील यासंबंधीचे कामकाज चालते. 
ही आहेत आव्हाने 
- आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानाकरिता परिमाणांसमोरही अनेक आव्हाने आहेत. 
- ऑटोमेटिक वेईंग इन्स्ट्रुमेंटस् अर्थात गतिमान अवस्थेतही एखाद्या वस्तूचे वजन करता येणे.
- इलेक्ट्रॉनचा प्रवाह मोजणारे इलेक्ट्रिसिटी मीटर्स.
- पाण्याचा प्रवाह मोजणारी साधने.
- इतर अन्य द्रवपदार्थ आणि वायू मोजण्यासाठी साधने. 
- टॅक्सिमीटर्स

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email