Pages

Follow by Email

Monday, 23 May 2016

बांगलादेशला ‘रोनू’ चा तडाखा

२० जणांचा बळी ढाका, दि २१ (वृत्तसंस्था) – बांगलादेशच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टीला रोनू चक्रीवादळाने जबरदस्त तडाखा देऊन आतापर्यंत २० जणांचा बळी घेतला आहे तर १०० हून अधिक रहिवासी जखमी झाले आहेत. वादळी वार्‍याबरोबरच संततधार वृष्टी होऊन अनेक ठिकाणी वसाहतीजवळच्या भागात दरडी कोसळल्या, रस्त्यावर झाडे कोसळली. यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या नैऋत्येस असलेल्या भोला आणि चित्तगाव किनारपट्टीस
रोनूचा जबरदस्त तडाखा बसल्याने या भागातील झोपड्या, घरे जमीनदोस्त झाली. निसर्गाच्या या तांडवात भोलामध्ये दोघेजण ठार तर १०० जण जखमी झाले. या घटनेत चित्तगावमध्ये आई आणि तिच्या तान्हुल्याचा मृत्यू झाला. पतौखालीमध्येही या वादळाच्या तडाख्यात सापडून एकाचा बळी गेला आहे. उड्डाणे रद्द रोनू चक्रीवादळामध्ये चित्तगाव येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. ढाक्का, खुलना, बदीसाल, चित्तगाव आणि सयलहेत विभागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जीवितहानी टळली रोनू वादळाची पूर्वसूचना हवामान खात्याकडून अगोदरच मिळाल्याने किनारपट्टीवरील पाच लाखाहून अधिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email