Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

‘ब्रिटानिका’ भारतीय सीओओची आत्महत्या

गुडगाव : जगप्रसिद्ध ‘एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका’ या विश्वकोष निर्माण करणाऱ्या कंपनीच्या भारतातील प्रमुखांनी आत्महत्या केली आहे. या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विनित विग यांनी ते राहत असलेल्या फ्लॅटमधून उडी घेवून जीवन संपवले.  नैराश्येतून आणि जीवनाचा कंटाळ आल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.    त्यांच्या
आत्महत्येनंतर त्यांचे वडील ओम विग यांना ह्रदयविकाराचा झटका आला असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    विग हे नावजलेले छायाचित्रकारही होते. त्यांनी घेतलेली बरीच छायाचित्रे जागतिक पातळीवरील मासिकांत प्रसिद्ध झाली आहेत.  १९ व्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी स्वच्छता कर्मचारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला.  या प्रकरणता पोलीस पुढील तपास करत आहेत

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email