Pages

Follow by Email

Friday, 27 May 2016

ममता बॅनर्जी सलग दुसर्‍यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान


27  मे :  तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या इतरही नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली तसंच, शाहरूख खान आणि सौरव गांगुलीही उपस्थिक होते.
गेल्याच आठवड्यात झालेल्या मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसने विधानसभेत जवळपास दोन तृतीयांश बहुमत मिळवत पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज केली होती.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email