Pages

Follow by Email

Tuesday, 24 May 2016

पंकज अडवानीची ऐतिहासिक कामगिरी


अबुधाबी - ‘स्यू’ क्रीडा प्रकारातील भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवानी याने आणखी एका ठिकाणी आपले नाव स्नूकरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले. पंकजने रविवारी रात्री मलेशियाच्या अव्वल मानांकित कीन हो मो याला ७-५ असे हरवून ही कामगिरी केली.

यामुळे स्नूकरचे जागतिक आणि उपखंडातील ‘६ रेड’ प्रकारात एकाच मोसमात विजेतेपद पटकाविणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

उपांत्य फेरीत पंकजने देशवासीय आदित्य मेहता याचा ६-१ असा पराभव केला होता. अंतिम फेरीत त्याची गाठ मलेशियाच्या अव्वल मानांकित कीन हो मो याच्याशी होती. पंकजने पहिली फ्रेम ३९-४ अशी सहज जिंकून सुरवात केली. कीन याने दुसरी फ्रेम तशीच ६-५१ अशी सहज जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या गेमला पंकजने (४०-१४) अशी बाजी मारली. पाठोपाठ चौथी गेम त्याला गमवावी लागली. त्यामुळे पुन्हा एकदा २-२ अशी बरोबरी होती. पाचव्या आणि सहाव्या गेमला मात्र पंकजने प्रतिस्पर्धी कीनला संधीच दिली नाही. त्याने ४१-७, ४४-८ अशा दोन फ्रेम सहज जिंकून आघाडी घेतली. सातव्या फ्रेमला कीनने बाजी मारली; पण आठवा गेम गमवावा लागल्याने पंकजने पुन्हा एकदा आघाडी घेतली. नववी गेमही ४५-३६ अशी जिंकून पंकजने आपली आघाडी भक्कम केली. पंकजने अखेरची बारावी फ्रेमही जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी अकरावी फ्रेम जिंकून कीन याने पंकजचे विजयाधिक्‍य वाढणार नाही, याची काळजी घेतली. 

पंकज आता याच स्पर्धेत सांघिक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल. संघात आदित्य मेहता, मानन चंद्रा, कमल चावला यांचाही समावेश आहे. 

आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील हे माझे पहिलेच वैयक्तिक विजेतेपद आहे. गेल्या महिन्यात ‘१५ रेड’ प्रकारात विजेतेपद हुकल्यामुळे माझ्यासाठी ‘मिशन आशिया’ अर्धवटच राहिले आहे. अर्थात, याच वर्षी या प्रकारात जागतिक विजेतेपद मिळविल्याचा आनंद नक्कीच वेगळा आणि सुखावह आहे.
- पंकज अडवानी

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email