Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

जगातील सर्वात वेगवान हेलिकॉप्टर!


एअरबसने आता जगातील सर्वात वेगवान ठरू शकणार्या हेलिकॉप्टरची निर्मिती केली असून त्याच्या तंत्रासाठी पेटंट अर्जही केला आहे. हे हायब्रिड हेलिकॉप्टरएअरबसच्यायुरोकॉप्टर एक्स3’ चे अद्ययावत रूप आहे. त्याचे काही काम अद्याप बाकी असून भविष्यात ते हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात नवे बदल घडवून आणू शकते. ‘एअरबस हेलिकॉप्टर्सम्हणजेचयुरोकॉप्टरच्या संकल्पनेचा एक भाग म्हणजे हे वेगवान
हेलिकॉप्टर आहे. ते लाँग रेंजचे अतिवेगवान हेलिकॉप्टर आहे. हेे एक कम्पौंड हेलिकॉप्टर असल्याचे या फ्रेंच कंपनीने म्हटले आहे. या युरोकॉप्टर एक्स 3 चा वेग 2013 च्या चाचणीवेळी ताशी 293 मैल इतका होता. आजपर्यंत कोणत्याही हेलिकॉप्टरचा वेग इतका प्रचंड नव्हता. वेगाशिवाय या हेलिकॉप्टरची अन्यही अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या नाकापासून शेपटीपर्यंतच्या अनोख्या रेषांचाही यामध्ये समावेश आहे. या हेलिकॉप्टरला जुळ्या इंजिनकडून शक्ती मिळते. ज्या हेलिकॉप्टरसाठी पेटंटचा प्रयत्न सुरू आहे, ते ताशी 293 मैल वेगाने उडू शकते, असे म्हटले जाते.


No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email