Pages

Follow by Email

Saturday, 28 May 2016

मॉरिस येंगखॉमला राष्ट्रीय शौर्य पदक

विजेची उपकरणे व वीजप्रवाह वाहून नेणार्‍या तारा यांच्याजवळ वावरत असताना नेहमी सावधगिरी बाळगायला हवी. कारण विजेचा छोटासा धक्का आपल्या शरीरावर मोठा परिणाम घडवू शकतो. मात्र, काही मुले खेळण्याच्या नादात या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशीच एक घटना मणिपूर राज्यात घडली. पण मॉरिस येंगखॉम या लहानग्याच्या प्रसंगावधानाने त्याच्या मित्राचा जीव वाचला. 14
वर्षांचा मॉरिस आपल्या घराच्या गच्चीवर आपल्या मित्रासोबत खेळत होता. खेळता-खेळता त्याच्या मित्राच्या हाताचा स्पर्श जवळच्या वीजवाहक तारेला झाला. तारेचे संरक्षक आवरण निघून गेल्याने त्याचा मित्र तारेला चिकटला. मॉरिसने हे पाहिले. त्याने प्रसंगावधान दाखवत जवळची वेताची खुर्ची उचलली व त्याच्या सहाय्याने आपल्या मित्राला विजेच्या तारेपासून दूर लोटले. मॉरिस म्हणतो की, जर ती वेताची खुर्ची तिथे नसती तर मित्राला वाचविण्यासाठी त्याला काही करता आले नसते. मॉरिसच्या शौर्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्याला राष्ट्रीय शौर्य पदक देऊन पंतप्रधानांच्या हस्ते गौरविले गेले.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email