Pages

Follow by Email

Friday, 27 May 2016

वेगवान इंटरनेटसाठी समुद्रातून जाणार केबल!


रेडमोंड (वॉशिंग्टन) - इंटरनेटचा वेग वाढण्यासाठी इंटरनेट केबलचे जाळे अटलांटिक समुद्रातून पसरविण्याचा प्रकल्प मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक संयुक्तपणे राबविणार आहेत. 
इंटरनेटचा वेग वाढविण्यासाठी "मारिया‘ नावाच्या सब सी केबलचे जाळे 2017 पर्यंत अटलांटिक समुद्रात पसरेल असा अंदाज संबंधित आधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एकूण 6600 किलोमीटर अंतराचे केबल समुद्रातून पुढे नेण्यात येणार आहे. "मारिया‘ ही एक प्रचंड साठवण क्षमता असलेली सब सी केबल असून तिचा माहिती वाहून नेण्याचा वेग सुमारे 160 टेराबाइट्‌स प्रतिसेकंद इतका आहे. या केबलची लांबी सहा हजार सहाशे आहे. या केबल प्रथम अमेरिका आणि दक्षिण युरोपातील कंपन्यांना जोडणार असून उत्तर व्हर्जिनिआ ते बिल्बाओ, स्पेन यांना जोडणार आहे. स्पेनमधील डेटा नेटवर्क हे अफ्रिका, अशिया, मध्य पूर्व, युरोपच्या काही भागांशी जोडला जाणार आहे. 

"जगभरातील ग्राहकांना चांगला वेग देता यावा हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरचे व्यवस्थापक क्रिस्टीन बिलेडी यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून सांगितले. तसेच "भविष्यात क्‍लाऊड कंप्युटिंगवर आधारित माहितीची देवाण-घेवाण होणार असून मायक्रोसॉफ्ट सातत्याने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे‘, असेही बिलेडी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email