Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

जगभरात एप्रिल ठरला सर्वात उष्ण महिना!


यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कासावीस करीत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये अजिबात काही चुकीचे नाही. अमेरिकेच्या ‘नासा’ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार हे खरेच आहे. गेला महिना तर पृथ्वीतलावरचा आधुनिक काळातील सर्वात उष्ण महिना होता असे दिसून आले आहे. यापूर्वी 2010 मधील एप्रिलची सर्वात उष्ण म्हणून नोंद झाली होती. हा विक्रम आता यंदाच्या एप्रिलने मोडला आहे.

पायाभूत सरासरीपेक्षा 0.24 अंश सेल्सिअसने 2010 चा एप्रिल अधिक उष्ण होता. यंदाचा एप्रिल सरासरीपेक्षा 0.87 अंश सेल्सिअसने अधिक होता. 1951 ते 80 या काळातील उष्णतेचे विक्रम मोडणार्‍या तीन महिन्यांमध्ये या महिन्याचा समावेश होतो. एप्रिलमध्ये समुद्राचे तापमानही अधिक होते. ते सरासरीपेक्षा 1.11 अंश सेल्सिअसने अधिक होते असे दिसून आले आहे. न्यू साऊथ वेल्समधील अँडी पिटमॅन यांनी याबाबतची माहिती दिली.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email