Pages

Follow by Email

Tuesday, 31 May 2016

सलमा धरणाचे उद्‍घाटन पंतप्रधान करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जूनपासून पाच देशांचा दौरा करणार आहेत. त्‍या दौर्‍यादरम्‍यान, नरेंद्र मोदी अफगाणिस्‍नानला भेट देवून तेथील भारतनिर्मित सलमा धरणाचे उद्‍घाटन करणार आहेत.    नरेंद्र मोदी दौर्‍याची सुरुवात अफगाणिस्‍तानपासून करणार आहेत. तेथून ते कतार आणि कतारमधून स्‍वित्‍झर्लंडला पोहोचणार आहेत.    सलमा धरण... भारत सरकारच्‍या वाप्‍कोस लिमिटेड या
उपक्रमांतर्गत केंद्रीय जल संधारण मंत्रालयाने अफगाणिस्‍तानातील हेरात प्रांतात चिश्‍ती शरीफजवळ हरिरुद नदीवर जवळपास एक हजार चारशे सत्तावन कोटींचे धरण बांधले आहे. येथे धरण बांधण्‍याचा निर्णय जानेवारी २००६ मध्‍ये घेण्‍यात आला होता. एक वर्षापुर्वी धरणाचे बांधकाम पुर्णत्‍वास आले होते. नदीच्‍या प्रवाहाची गती कमी असल्‍याने हे धरण भरण्‍यासाठी जवळपास एक वर्ष लागले. धरणाची लांबी २० किलोमीटर आणि रुंदी ३.७ कि.मी. आहे. या धरणाच्‍या पाण्‍यामुळे ८० हजार हेक्‍टर शेती सिंचनाखाली येवू शकते. तसेच धरणाच्‍या पाण्‍यावर ४२ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्‍पही उभारण्‍यात आला आहे. या प्रकल्पामुळे ऊर्जा आणि सिंचनाची गरज भागणार आहे तसेच पश्चिम अफगाणिस्तानचा सर्वांगीण आर्थिक विकास होवून अफगाणिस्तानमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढणार आहे.   गेल्‍यावर्षी नरेंद्र मोदी यांनी अफगानिस्तानच्‍या संसद भवनच्‍या नव्‍या इमारतीचे उद्घाटन केले होते. ही इमारतदेखील भारतनिर्मित आहे.    मोदी ७ जूनला अमेरिकेच्‍या दौर्‍यावर जाणार आहेत. भारतात परतताना मेक्‍सिकोचा दौरा करणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्‍या महिन्‍यात अमेरिकेच्‍या दौर्‍यावर जात असताना स्‍वित्‍झर्लंडला जाण्‍याची शक्‍यता आहे. या दौर्‍यादरम्‍यान नरेंद्र मोदी भारतीयांनी स्‍विस बँकेत ठेवलेल्‍या काळा पैशांसंदर्भात स्‍विसच्‍या अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्‍याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. परराष्‍ट्र मंत्रालयाने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.   

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email