Pages

Follow by Email

Thursday, 26 May 2016

भारतात जन्मली जगातली सर्वाधिक वजन असलेली मुलगी

हसन : कर्नाटकमध्ये जगातल्या सगळ्यात जास्त वजन असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन तब्बल 15 पाऊंड आहे. सोमवारी हसनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांच्या नंदिनीनं 15 पाऊंड म्हणजेच 6.8 किलो वजन असलेल्या मुलीला जन्म दिला. एवढं वजन असलेल्या या मुलीची आई फक्त 19 वर्षांची असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

याआधी मैसाच्यूसेट्समध्ये जन्मलेली 6.3 किलोची कॅरिसा रुसेक सर्वाधिक वजन असलेली मुलगी होती. एवढं वजन असलेल्या मुलीचा जन्म होणं हे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. मुलीच्या जन्माच्यावेळी ऑपरेशनला अर्धा तास लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच मुलीची प्रकृती व्यवस्थित असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email