Pages

Follow by Email

Tuesday, 24 May 2016

‘स्‍मार्ट सिटी’मध्‍ये आणखी तेरा शहरे


केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशातील आणखी १३ शहरांची निवड केली आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २० शहरांची निवड करण्यात आली होती. 
यापूर्वी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात देशातील 20 शहरांची स्मार्ट सिटी योजनेत निवड केली होती. आता आणखी 13 शहरांची निवड केल्याने देशातील 33 शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणार आहेत. या सर्व शहरांमध्ये 80 हजार 789 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी 27 शहरांची निवड या योजनेत करण्यात येणार आहे.
 
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज फास्ट ट्रॅक कॉम्‍पिटिशनअंतर्गत १३ शहरे स्मार्ट सिटी होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या १३ शहरांमध्ये लखनौ, पणजी, चंदीगड, रायपूर, न्यू टाऊन कोलकाता, रांची, फरीदाबाद, भागलपूर, पोर्ट ब्लेअर, इंफाळ, अगरतळा, वारंगळ आणि धर्मशाला या शहरांचा समावेश आहे. या शहरांच्‍या विकासासाठी १३ हजार २२९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे. 
 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email