Pages

Follow by Email

Tuesday, 24 May 2016

व्हिएतनामवरील शस्त्रबंदी अमेरिकेने अखेर उठविली


हनोई - गेली काही दशके व्हिएतनामवर प्राणघातक शस्त्रांची विक्री करण्यावर घातलेली बंदी उठवत असल्याची घोषणा अमेरिकेने आज केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाई कुआंग यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, की अमेरिकेशी व्हिएतनामचे असलेले दृढ संबंध लक्षात घेऊनच ही बंदी उठविण्यात आली आहे.  दोन्ही देशांदरम्यानच्या भयंकर युद्धाच्या इतिहासानंतरही व्हिएतनामच्या सहकार्य धोरणाची स्तुती करताना ओबामा यांनी त्यांचे आभारही मानले. तत्पूर्वी, सोमवारी दोन्ही नेत्यांनी व्हिएतनामचे कम्युनिस्ट नेते हो ची मिन्ह यांच्या भव्य ब्राँझ मूर्तीसमोर हात मिळविले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुजन राईसही ओबामा आणि व्हिएतनामच्या अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email