Pages

Follow by Email

Saturday, 21 May 2016

शिवांश सिंग- राष्ट्रीय शौर्य पुरस्कार


अनेक बालवीर असे असतात, जे इतरांचे प्राण वाचविताना स्वत:चा प्राण गमावतात. यामुळे त्यांच्या साहसाचे महत्त्व कमी होत नाही. अशाच बालवीरांपैकी एक म्हणजे 14 वर्षांचा उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील बालवीर शिवांश सिंग. एक उत्कृष्ट जलतरणपटू व सन्मान पदक विजेता जलतरण खेळाडू.
शरयू नदीत बुडत असलेल्या मित्राचा जीव वाचविताना त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याच्या आईला हे कळल्यावर धक्का बसला. मात्र आपल्या श्ाूर मुलाचा तिला अभिमानही आहे. 26 
जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते शिवांशच्या आईने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार स्वीकाराला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ‘शिवांश आज हयात असता तर पुरस्कार समारंभाला जमलेले मान्यवर व अनेक बालवीर-वीरबाला पाहून त्याला आनंद झाला असता’ असे शिवांश सिंगच्या आईने सांगितले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email