Pages

Follow by Email

Saturday, 28 May 2016

फ्रँकिंग (हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग)

खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रँकिंग किंवा हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग हे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आहे. पारंपरिक ड्रिलिंग तंत्रज्ञानात खनिज तेल व नैसर्गिक वायू भूगर्भातून मिळवण्यासाठी व्हर्टिकल म्हणजे वरून खालच्या दिशेने खोदकाम करून नंतर पंपाद्वारे जमिनीतील काळे सोने वर आणले जाते. या उलट फ्रँकिंग तंत्रज्ञानात होरिझोंटल म्हणजे आडवे खोदकाम केले
जाते. खडकांमध्ये अडकलेले खनिज तेल व नैसर्गिक वायू बाहेर काढण्यासाठी पाणी, वाळू व सुमारे सहाशे रसायनांचे मिश्रण असलेले द्रव वापरून खडक फोडले जातात. यात खनिज तेलाचा थेंब न थेंब मिळवता येतो. सहाशे रसायनांत अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड, एथेनॉल, मिथेनॉल, बोरिक अ‍ॅसिड, सायट्रिक अ‍ॅसिड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड व अगदी गवारीपासून मिळवलेल्या गोंदाचाही वापर होतो. फ्रँकिंग तंत्रज्ञानामुळे अमेरिकेने आपल्या खनिज तेलाचे उत्पादन तिप्पट केले आहे. यामुळे अमेरिका खनिज तेलाबाबतीत स्वयंपूर्ण बनली आहे. फ्रँकिंग तंत्रज्ञानामुळे जमिनीचे प्रदूषण होत असल्याचा दावा काही पर्यावरणवादी संस्थांनी केला आहे. मात्र, या त्रुटीवर मात करून फ्रँकिंग तंत्रज्ञान अधिक पर्यावरण स्नेही करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email