Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

भारतीय शांतीसैनिकाचा "यूएन' करणार गौरव

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत काम करताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या चार भारतीय शांतीसैनिक आणि नागरिकांचा संयुक्त राष्ट्रसंघाकडूनच गौरव केला जाणार आहे. हेडकॉन्स्टेबल शुभाकरन यादव, रायफलमॅन मनीष मलिक, हवालदार अमल डेका, नायक राकेश कुमार, गगन पंजाबी यांना मरणोपरांत विशेष पदक प्रदान केले जाईल. यादव आणि मलिक यांचा कॉंगोमधील मोहिमेमध्ये सहभाग होता, मध्यंतरी राजकीय अराजकतेच्या गर्तेमध्ये अडकलेल्या कॉंगोमध्ये स्थैर्य आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने विशेष मोहीम चालविली होती.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email