Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

दुष्काळ निवारणासाठी आपत्ती निवारण निधी उभारा : सुप्रीम कोर्ट


देशातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण निधी उभारा, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे.
महाराष्ट्र, बिहार, हरियाणा आणि गुजरातसह देशातल्या अकरा राज्यांत भीषण दुष्काळ आहे, जनता या भीषण दुष्काळाने अक्षरशः होरपळत आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे दुष्काळग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय.
योगेंद्र यादव यांच्या स्वराज अभियान या स्वयंसेवी संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावरच्या सुनावणीत कोर्टाने ही सूचना केली आहे. तसंच केंद्रीय कृषी मंत्रालयाने बिहार, गुजरात आणि हरियाणा या राज्यांसोबत बैठक घेऊन परिस्थिती जाणून घ्यावी, असेही निर्देश दिले आहेत.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email