Pages

Follow by Email

Thursday, 26 May 2016

पीएफधारकांच्या विमा संरक्षणात वाढ, आता 6 लाख रूपयांचा विमा


नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ केलीय. आता पीएफ धारकांना तब्बल सहा लाख रूपयांचा विमा मिळणार आहे. याचा लाभ जवळपास चार कोटी पीएफ धारकांना होईल.
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही माहिती दिली.


पीएफ धारकांच्या ईपीएफओकडे जमा असलेल्या रकमेशी निगडीत विमा संरक्षण योजना राबवण्याचा निर्णय पीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घेतला होता. त्यावेळी प्रत्येक पीएफ धारकांना किमान 3.6 लाख रूपयांचा निश्चित विमा मिळेल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामध्ये आता घसघशीत वाढ करण्यात आलीय. नव्या वाढीनंतर पीएफ धारकांना निश्चित असा 6 लाख रूपयांचा विमा मिळेल.
 
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त समितीने या निर्णयाला हिरवा कंदिल दिला असला तरी अजून त्याची अधिसूचना निघालेली नाहीय, कारण कायदा मंत्रालयाने या निर्णयाला अजून स्वीकृती दिलेली नाही. कायदा मंत्रायलाच्या स्वीकृतीनंतर केंद्रीय श्रम मंत्रालय वाढीव विमा रकमेची अधिसूचना जारी करणार आहे.

 
ईपीएफओकडे नोकरदारांच्या जमा असलेल्या रकमेतून या विम्याचा प्रीमियम कापला जाईल. त्यानंतर पीएफ धारक ईपीएफओचा सदस्य असताना त्याचं काहीही बरं-वाईट झालं तर त्याच्या कुटुंबीयांना सहा लाख रूपयांची मदत विमाच्या रकमेतून मिळू शकेल.

 
या तरतुदीसोबतच 2015-16 या आर्थिक वर्षासाठी 8.8 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला असून त्याची अधिसूचनाही जारी करण्यात आलीय. यापूर्वीच्या निर्णयानुसार 2015-16 साठी 8.75 टक्के एवढं व्याज निश्चित करण्यात आलं होतं.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email