Pages

Follow by Email

Friday, 27 May 2016

2023 ला येणार 'बुलेट ट्रेन'


नवी दिल्‍ली  :
2023 च्‍या दरम्‍यान देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार असून त्‍या प्रोजेक्‍टवर चांगले काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे 508 किमी चे अंतर अवघ्‍या दोन तासात पूर्ण करणार आहे. सदर रेल्‍वे तासी 320 ते 350 कि. मी या वेगाने धावणार आहे.
 
या बुलेट ट्रेनचे वैशिष्‍ठ म्‍हणजे ही रेल्‍वे समुद्राखालून जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या 508 कि. मी. पैकी 21 कि.मी हे अंतर ही रेल्‍वे समुद्राखालून पार करणार आहे. 21 कि. मी. लांबीचा बोगदा तयार करण्‍यात येणार असून तो समुद्राखालून जाईल. अशी ही देशातील पहिलीच रेल्‍वे असणार आहे. 
 
या बुलेट ट्रेनचा खर्चही खूप मोठा आहे. सुमारे 97 हजार कोटी एवढा खर्च अपेक्षित असून यातील 81 टक्‍के खर्च जपान करणार आहे. याआधी जपान बरोबर या विषयावर चर्चाही झाली आहे. जपान या कार्यात मदत करण्‍यास तयार असून देशात लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. 

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email