Pages

Follow by Email

Tuesday, 31 May 2016

चं 11 वर्षांपूर्वीचं हे रेकॉर्ड कूकनं तोडलं


 इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे. सर्वात लहान वयामध्ये दहा हजार रन बनवण्याचं सचिनचं 11 वर्षांपूर्वीचं हे रेकॉर्ड कूकनं तोडलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी कूकनं हा मान पटकावला. 128 टेस्ट मॅच खेळल्यानंतर कूकनं दहा हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. वयाची 31 वर्ष 5 महिने आणि 5 दिवसांचा असताना कूकनं हे रेकॉर्ड केलं आहे. सचिन तेंडुलकरनं 31 वर्ष 10 महिने आणि 20
दिवसांचा असताना 2005मध्ये हे रेकॉर्ड बनवलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये दहा हजार रन बनवणारा कूक हा बारावा खेळाडू बनला आहे.

कोण आहेत हे 12 खेळाडू ?

सचिन तेंडुलकर 
ब्रॅन लारा
कुमार संगकारा
रिकी पॉईंटिंग
राहुल द्रविड
महिला जयवर्धने
सुनिल गावसकर
जॅक कॅलिस
ऍलन बॉर्डर
शिवनारायण चंद्रपॉल
स्टीव्ह वॉ

ऍलिस्टर कूक 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email